ashish-vidyarthi

सुप्रसिद्ध खलनायक आशिष विद्यार्थीनीं दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ

950 0

मुंबई : हिंदी आणि साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय खलनायक अशी ओळख असणारे आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी नुकतीच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे वयाच्या साठीत असणाऱ्या आशिष यांनी विवाह करत सर्वांनाच चकित केलं आहे. या ज्येष्ठ अभिनेत्याने हिंदी,मराठी, तेलुगू, तामिळ, कन्नडा,इंग्लिश अशा जवळपास सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

आशिष विद्यार्थीनीं यांनी आसाममधील (Assam) प्रसिद्ध फॅशन इंटरप्रिटर असणाऱ्या रुपाली बरुआ यांच्याशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो (Photo Viral) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी कोलकत्तामधील एका क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लग्नगाठ बांधली आहे. आशिष आणि रुपाली यांनी आसामी पद्धतीने विवाह केला आहे.

कोण आहे रुपाली बरुआ ?
आशिष विद्यार्थी यांची दुसरी पत्नी रूपाली बरूआ या मूळच्या आसामच्या असून त्या एक प्रसिद्ध फॅशन इंटरप्रिटर आहे. त्यांचं स्वतःचं फॅशन स्टोर आहे. तसंच मिळालेल्या माहितीनुसार, आशिष आणि रूपाली यांची भेट त्यांच्या स्टोअरवर झाली होती. त्यावेळी त्यांची मैत्री झाली आणि काही दिवसांनंतर मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. आणि अखेर त्यांनी लग्न केले.

Share This News
error: Content is protected !!