Silvina Luna

Silvina Luna : प्लास्टिक सर्जरी करणे बेतले जीवावर; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू

2064 0

अर्जेंटिनाची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल सिल्विना लुना (Silvina Luna) हिचे निधन झाले आहे. ती 43 वर्षांची होती. प्लास्टिक सर्जरीमुळे तिला किडनीशी संबंधित समस्या होत्या, त्यामुळे गुरुवारी सिल्विनाची प्राणज्योत मालवली. तिच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

काय घडले नेमके?
2011 मध्ये सिल्विना लुनाने प्लास्टिक सर्जरी केली होती, ज्यामुळे तिला काही शारीरिक व्याधीने ग्रासलं. चुकीच्या प्लास्टिक सर्जरीमुळे सिल्विना लुना दीर्घकाळापासून किडनीच्या समस्येनेही ग्रस्त होती. तिचं आजारपण सुरूच असायचं, अशातच तिची प्रकृती खालावल्याने गेल्या 79 दिवसांपासून तिला अर्जेंटिना येथील इटालियन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे तिच्यावर उपचार सुरू होते.

सिल्विना लुनाच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून कोणतीही सुधारणा झाली नव्हती, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तिच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी विचारले असता तिच्या भावाने बहिणीला व्हेंटिलेटरवरून काढण्याची परवानगी दिली, त्यानंतर काही वेळातच लुनाचे निधन झाले. तिचे वकील फर्नांडो बरलांडो यांनी तिच्या मृत्यू पुष्टी केली. सिल्विना लुना सोशल मीडियावरही खूप सक्रिय होती. इन्स्टाग्रामवर तिचे जवळपास 15 लाख फॉलोअर्स आहेत.

Share This News
error: Content is protected !!