Akola News

Akola Crime : संपत्तीच्या वादातून काका-काकूकडून पुतण्याची हत्या

5523 0

अकोला : संपत्तीच्या वादातून कुटुंबातील एकाची हत्या केल्याची घटना अकोल्यातील (Akola Crime) पातूर तालुक्यातील भंडारज खुर्द याठिकाणी घडली आहे. मिलिंद तुळशीराम इंगळे (वय 36) असे मृत व्यक्तिचं नाव आहे. दरम्यान, संपत्तीच्या वादातून मृतकाच्या काका अन् काकूने मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर मिलिंदची आत्महत्या वाटावी यासाठी गळफास घेतलेल्या अवस्थेत टांगले. इतकेचं नव्हे तर त्याची पत्नी पोहचेपर्यंत अंत्यसंस्काराची तयारी देखील सुरू केली.

मृतकाची पत्नी गावात परतल्यानंतर तिला संशय आला. त्यामुळे तिने पातूर पोलिसांना सोबत घेऊन गाव गाठले. परंतु, ती गावात पोहोचण्याच्याआधीच मृतकावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी कुटुंब आणि गावकऱ्यांनी केली. दरम्यान, अंत्यसंस्काराच्या वेळेवर बुधवारी सायंकाळी मृतकाची पत्नी पोलिसांना घेऊन पोहोचल्याने अंत्यसंस्कार थांबवण्यात आला.

पातुर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. आता वैद्यकीय अहवालानंतर मिलिंद इंगळे यांनी आत्महत्या केली नसून त्यांना मारहाण करून गळा आवळून त्यांची हत्या केली अन् गळफासावर लटकवून आत्महत्या केल्याचा बनाव केला असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी काका काकुंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Share This News

Related Post

bhopal vote

Loksabha Election : महाराष्ट्रात 5 व्या टप्प्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 28.51% मतदान; ‘या’ ठिकाणी झाले कमी मतदान

Posted by - May 20, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. देशातील 49 जांगासह महाराष्ट्रातील 13 मतदारसंघासाठी मतदान…

#PUNE : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराजवळ वाहतूक नियमनाऐवजी वसुली करणारा पोलीस कर्मचारी निलंबित

Posted by - March 15, 2023 0
पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी रोजच लाखो भाविक येत असतात. त्यामुळे या परिसरात सातत्याने गजबजाट असतोच. अशातच…

मोठी बातमी ! अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग

Posted by - June 15, 2022 0
अलिबाग- अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या या आगीमुळे एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या…

Special Report : ‘चल रे भोपळ्या टूणूक टूणूक’.. ! यवतमाळ जिल्ह्यातील भीषण वास्तव… पाहा (VIDEO)

Posted by - August 6, 2022 0
यवतमाळ : स्वातंत्र्याचा काळ उलटून 75 वर्ष पूर्ण होत आली मात्र यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यातील वाघद -कर्मळा या गावातील नागरिकांना…

#DHULE : काजू समजून खाल्ल्या चंद्रज्योतच्या विषारी बिया; धुळ्यात 7 चिमुरड्यांना विषबाधा

Posted by - February 3, 2023 0
धुळे : काजू समजून चंद्रज्योती या फळाच्या बिया खाल्ल्यामुळे 7 मुलांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची घटना काल धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *