डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं

635 0

सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या साक्षीदारांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान मारेकऱ्यांना ओळखले असून सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनीच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे साक्षीदारांनी न्यायालयात सांगितले आहे.सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना ओळखणारे दोन्ही साक्षीदार पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी असून त्यापैकी एक पुरुष तर एक महिला आहे. अशी साक्ष त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी दोन आरोपींनी हत्या केली होती. नरेंद्र दाभोलकर यांची ज्या क्षणी हत्या करण्यात आली त्याचवेळी या प्रकरणातील साक्षीदार हे शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर साफसफाई करीत होते.दाभोलकर पुलावरून चालत निघाले असताना दुचाकीवरून आलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी दाभोलकरांवर गोळीबार केला आणि ते शनिवार पेठेच्या दिशेने पळाल्याचे साक्षीदारांनी न्यायालयात सांगितले.

सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉ. विरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांच्यावर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा आरोप आहे. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी आज पुणे न्यायालयात साक्षीदारासमोर आरोपींची ओळख परेड झाली. उर्वरित पुढील ओळख परेड 23 मार्च रोजी होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!