भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा, कोथरुड मतदार संघातर्फे आयोजीत भव्य महिला मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम राजलक्ष्मी सभागृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे, कोथरुड मंडळ अध्यक्ष पुनीतजी जोशी हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.स्री शक्तीचा लढा हा आपला सर्वांचा लढा असून प्रत्येक क्षेत्रात तो आपण सर्व महिलांनी मिळून एकत्रितपणे लढूया असे प्रतिपादन भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केले.
भाजपा कोथरुड महिला मोर्चाच्या वतीने महिला सबलीकरण व सशक्तीकरणाबाबत दिलेल्या भरीव योगदानाबद्दल चित्राताई वाघ यांचा व पुण्याचे महापौर म्हणून केलेल्या अभूतपूर्व कार्याबद्दल मुरलीधरअण्णा मोहोळ यांचा सन्मानचिन्ह, शेला व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. समाजासाठी अहोरात्र केलेल्या कार्याबद्दल आशा वर्कर्सचा देखील यावेळी कृतज्ञता सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच याप्रसंगी प्रियंवदा पुरोहीत यांचा त्यांच्या सहकाऱ्यांसह भाजप मध्ये जाहीर प्रवेश देखील करण्यात आला.
प्रसिद्ध गायक बॅाईज फेम दिग्विजय जोशी यांनी आपल्या अनोख्या शैलीत होम मिनिस्टर खेळाचे संचालन करुन उपस्थितांची मने जिंकली. विजेत्या महिलांना पैठणी, सोन्याची नथ, चांदीचा छल्ला व लकी ड्रॅा द्वारे काही भाग्यवंत विजेत्यांना चंदुकाका सराफ, किचन वंडर्स, सोन रुपम ज्वेलर्स यांच्या सौजन्याने विशेष बक्षीसे यावेळी देण्यात आली. कलर्स मराठी फेम अभिनेत्री पूजा पुरंदरे यांनी देखील महिलांचा उत्साह वाढवला.
यावेळी भाजप प्रदेश चित्रपट आघाडीचे अजय नाईक,नगरसेवक जयंत भावे, हर्षालीताई माथवड, वासंतीताई जाधव, अल्पनाताई वर्पे, माधुरीताई सहस्त्रबुद्धे, छायाताई मारणे, वृषालीताई चौधरी, डॅा. श्रद्धाताई प्रभुणे, स्विकृत सदस्या मितालीताई सावळेकर, बाळासाहेब टेमकर व कांचनताई कुंबरे,अनिताताई तलाठी, रेश्माताई सय्यद, गायत्रीताई भागवत, प्रा.अनुराधाताई येडके, शुभांगीताई जोशी, रुपेश भोसले, कैलास मोहोळ, सागरजी कडू, प्रदीप जोरी विजय राठोड, सोनियाताई महाजन, निर्मला रायरीकर आदी पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजप महिला मोर्चा कोथरुड अध्यक्षा हर्षदाताई फरांदे व महिला मोर्चा टीम शितल गुंड,गायत्री काळभोर, सुरेखा जगताप, केतकी कुलकर्णी, सुप्रिया माझीरे, पल्लवी गाडगीळ, विद्या टेमकर, कल्याणी खर्डेकर, लता उभे, अमरजा पटवर्धन, सुवर्णा काकडे, रमा डांगे, जयश्री टेमघेरे, सुषमा तेलकर, जयश्री घाटे, सविता शिंदे, उर्मिला कदम, अस्मिता करंदीकर, प्रियांका पेंडसे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरचिटणीस गायत्रीताई काळभोर यांनी केले.