Cockroaches

Cockroaches : कोंबड्याप्रमाणे ‘या’ ठिकाणी पाळली जातात झुरळं; पौष्टिक म्हणून लोक आवडीने खातात

425 0

नवी दिल्ली : आपण आतापर्यंत कुत्रा, मांजर, कोंबड्या पाळल्याचे ऐकले किंवा पाहिले असेल. पण जगामध्ये असे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी झुरळं (Cockroaches) पाळली जातात. एवढेच नाहीतर पौष्टिक म्हणून लोक ते आवडीने खात असतात. ज्या पद्धतीने कोंबड्या पाळल्या जातात. मधासाठी मधमाश्या पाळल्या जातात, त्याचप्रमाणे झुरळांचीही शेती केली जाते. आपल्याकडे झुरळ बघून लोक पळून जातात, तर इथे मात्र परिस्थिती वेगळीच आहे. झुरळांना मारण्याऐवजी किंवा त्यांचा नायनाट करण्याऐवजी इथे मुद्दाम झुरळ पाळले जातात.

झुरळं पाळण्याबद्दल ऐकून तुम्हाला आणि विचित्र वाटेल, पण चीनमधील लोकांसाठी हा व्यवसाय आपल्या देशात असणाऱ्या मासे, कुक्कुटपालन किंवा मधमाशीपालनाइतकाच फायदेशीर आहे. येथे हजारोंच्या संख्येनं झुरळं पाळली जातात आणि हार्वेस्ट केली जातात. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल.

या ठिकाणी ही झुरळं का पाळली जातात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यामागेदेखील एक कारण आहे. चीनमधील लोक झुरळांना प्रथिनांचा समृद्ध स्रोत मानतात आणि ते नियमितपणे भाजून स्नॅक किंवा साइड डिश म्हणून खातात. गमतीची गोष्ट म्हणजे ते मुलांनाही खायला दिले जातात.

Share This News
error: Content is protected !!