Naresh Mhaske

Naresh Mhaske : नगरसेवक ते संभाव्य खासदार…कोण आहेत नरेश म्हस्के?

3518 0

ठाणे : ठाण्यासारख्या राजकीय दृष्ट्या अंत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातून अनेक आजी-माजी आमदार, खासादरांच्या नावाची चर्चा असताना सर्वांना धोबीपछाड देत शिंदे गटाकडून नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. नगसेवक ते संभाव्य खासदार 10 वर्षात एवढी मोठी झेप घेणारे नरेश म्हस्के नेमके कोण आहेत? त्यांची कारकीर्द नेमकी कशी आहे? त्याबद्दल आज जाणून घेऊया…

कोण आहेत नरेश म्हस्के ?
नरेश म्हस्के हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे ठाण्यातील नेते आहेत.नरेश म्हस्के यांनी नगरसेवक पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 2012 साली नरेश म्हस्के पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेमध्ये नगसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर पुन्हा 2017 साली ते दुसऱ्यांदा नगरसेवक झाले. 2017 साली नरेश म्हस्के यांची महानगरपालिकेमध्ये सभागृह नेतेपदी नियुक्ती झाली. 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर निवडणुकीमध्ये उमेदवार न दिल्याने नरेश म्हस्के बिनविरोध महापौर म्हणून निवडून आले.

2019 साली ते ठाणे महानगरपालिकेमध्ये नरेश म्हस्के शिवसेनेचे महापौर झाले. ते नोव्हेंबर 2019 ते मार्च 2022 दरम्यान ठाण्याच्या महापौर पदी होते.2022 मध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर नरेश म्हस्के एकनाथ शिंदें गटात सहभागी झाले. नरेश म्हस्केंच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेमधील जवळपास सर्वच माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. शिंदेंचे सध्याच्या घडीला ठाण्यातील सर्वात विश्वासू सहकारी म्हणून नरेश म्हस्केंकडे पाहिलं जातं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं ! पोटच्या मुलाने केली आईची निर्घृणपणे हत्या

Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी गमावले होते आपले प्राण

Maharashtra Politics : महायुतीकडून कल्याण आणि ठाण्याच्या उमेदवारांची नावे जाहीर

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!