तंत्रज्ञान कंपनी मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्म यांनी मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्स अँप वर जिओमार्ट लाँच करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. या भागीदारीमुळे रिलायन्स रिटेलचे ग्राहक व्हॉट्सअॅपवर किराणा सामान ऑर्डर करू शकतील. या संदर्भात जारी केलेल्या संयुक्त निवेदनानुसार, व्हाट्स अँप वर जिओमार्ट ऑनलाइन खरेदीदारांना जिओमार्ट च्या किराणा मालाच्या यादीशी जोडता येणार आहे. ग्राहक या यादीतील वस्तू ‘कार्ट’मध्ये टाकण्यासाठी पैसे देऊन खरेदी करू शकतात.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 45 व्या सर्वसाधारण ( एजीएम) बैठकीत, ईशा अंबानीने ऑनलाइन किराणा ऑर्डरिंग आणि व्हॉट्सअॅप वापरून पेमेंट यावर सादरीकरण केले. मेटाचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारतात जिओमार्ट सोबत आमची भागीदारी सुरू करण्यास उत्सुक आहे. व्हाट्स अँप वर आमचा हा पहिला ‘एंड-टू-एंड शॉपिंग’ अनुभव आहे. याद्वारे लोक आता थेट जिओमार्ट वरून चॅटमध्ये किराणा सामान ऑर्डर करू शकतात.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, “आमची दृष्टी भारताला जगातील आघाडीची डिजिटल सोसायटी म्हणून पुढे न्यावयाची आहे.”