मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnatak Election) निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने (Congress) एक हाती सत्ता राखली आहे.भाजपला कर्नाटकमध्ये मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांना त्या ठिकाणी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. कर्नाटकाच्या या निकालावरून आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
कर्नाटकमध्ये जवळपास दुपट्ट जागांवर काँग्रेसला यश मिळत आहे. सत्तेचा गैरवापर केल्यानं भाजपचा पराभव झाला आहे. तसेच शरद पवारांनी काँग्रेसचे अभिनंदनदेखील केले आहे. तसेच कर्नाटकच्या लोकांना खोक्यांचं राजकारण लोकांना नापसंत असल्याचे म्हणत भाजपवर जोरदार टीकासुद्धा केली आहे. मोदी, शाहांनी सभा घेऊन आणि भाजपचे नेते कर्नाटकात तळ ठोकून असतानादेखील भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
यादरम्यान त्यांना कर्नाटकसारखा कौल महाराष्ट्रात (Maharashtra Election) पाहायला मिळेल का? असं विचारलं असता, ते म्हणाले की लोकांना इथेही बदल हवा आहे. तो पुढच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल. यादरम्यान त्यांनी महाविकासआघाडी (Mahavikas Aaghadi) आता महाराष्ट्रात भाजपला (BJP) हरवण्यासाठी एकत्र येणार असल्याचे संकेत दिले आहेत.