RSS

मुस्लिम महिलेचे व्यंगचित्र व्हायरल केल्याने कर्नाटकात RSS कार्यकर्त्याला अटक

575 0

बंगळुरू : सध्या कर्नाटकातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याने एका मुस्लिम महिलेचे व्यंगचित्र (Cartoon) समाज माध्यमांवर शेअर केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्या कार्यकर्त्याला अटक केली आहे. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
यामध्ये एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याने एका मुस्लिम महिलेचे व्यंगचित्र समाजमाध्यमांवर पोस्ट केले. तसेच या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने ‘मुले जन्माला घालणारी फॅक्टरी’असा उल्लेख केला होता. या घटनेमुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अनेकांनी यावर तीव्र आक्षेप घेत, संबधीतावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या व्यक्तीने हे व्यंगचित्र त्यांच्या व्हॅाटसअ‍ॅप स्टेटसवर शेअर केल्यानंतर मुस्लिम समाजामध्ये तीव्र नाराजी उमटली आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी रायचूर पोलिसांनी (Raichur Police) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याला अटक केली आहे. राजू थुंबक (Raju Thumbak) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते लिंगासुगुर येथील रहिवाशी आहेत.

Share This News

Related Post

मुख्यमंत्री छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान राखतील, संभाजीराजे छत्रपती यांचे सूचक वक्तव्य

Posted by - May 24, 2022 0
कोल्हापूर- राज्यसभेसाठी उत्सुक असलेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण याआधी सविस्तर…
Nilesh Rane

Nilesh Rane : फडणवीसांचा ‘तो’ सल्ला ऐकून निलेश राणेंनी निवृत्ती घेतली मागे

Posted by - October 25, 2023 0
मुंबई : भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी दोन दिवसांपूर्वी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. ती आता त्यांनी…
Accident Video

Accident Video : आधी कारने उडवलं नंतर तरुणीच्या अंगावर घातली गाडी; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Posted by - December 27, 2023 0
जयपूर : वृत्तसंस्था – जयपूरमधून एक धक्कादायक घटना (Accident Video) समोर आली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.…

Maharashtra Politics : शिवसेनेचे खासदार-आमदार शिंदे गटात, परंतु कार्यकर्ते पक्षप्रमुखांबरोबर

Posted by - July 23, 2022 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार त्यांच्या गोटात गेल्यानंतरही शिवसेनेचे पदाधिकारी आणि सामान्य शिवसैनिक मात्र अजूनही शिवसेनेतच…
Hingoli News

Hingoli News : भाजप आमदाराकडून नरसी नामदेव संस्थेच्या विश्वस्ताला बेदम मारहाण

Posted by - September 20, 2023 0
हिंगोली : भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि त्यांच्या समर्थकांनी हिंगोलीच्या (Hingoli News) नरसी नामदेव संस्थांच्या विश्वस्ताला बेदम मारहाण केली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *