भारतरत्न गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज सकाळी 8:12 मिनिटांनी निधन झालं वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली
लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आला आहे आज संध्याकाळी मुंबईतील शिवाजी पार्क येथे लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अंत्यदर्शनासाठी उपस्थितीत राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 4:30 वाजता मुंबईत दाखल होणार आहेत.
दरम्यान लतादीदींच्या अंत्यसंस्काराची तयारी शिवाजी पार्कवर सुरू झाली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवाजी पार्क येथे दाखल झाले असून त्यांनी अंत्यसंस्काराच्या तयारीचा आढावा घेतला. आदित्य ठाकरे यांच्यासोबत पोलीस सहआयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील, सहआयुक्त मुंबई महापालिका किरण दिघावर देखील उपस्थितीत होते. लतादीदींवर आज संध्याकाळी 6:30 वाजता शासकीय इमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.