Narendra Modi In US

PM Modi in US : बायडेन दाम्पत्याला पंतप्रधान मोदींनी दिल्या ‘या’ खास भेटवस्तू

578 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर (PM Modi in US) आहेत. त्यांचा हा दौरा (PM Modi in US) सध्या फारच चर्चेचा विषय ठरत आहे. अमेरिका दौऱ्याचा त्यांचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या वॉशिंग्टन येथील एका कार्यक्रमात (PM Modi in US) भाग घेतला. त्यानंतर मोदी व्हाईट हाऊसमध्ये गेले. त्याठिकाणी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी मोदी यांनी फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना खास गिफ्ट देत भारतातील महाराष्ट्रासहीत दहा राज्यातील महत्त्वाच्या वस्तू भेट म्हणून दिल्या.

गिफ्टमध्ये कशाकशाचा आहे समावेश?
महाराष्ट्राचा गूळ, पंजाबचे तूप, उत्तराखंडचे तांदूळ आणि हिरा अशा अनेक वस्तूंचा मोदींनी दिलेल्या गिफ्टमध्ये समावेश आहे.पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना 7.5 कॅरेटचा हिरवा हिरा गिफ्ट दिला. हा हिरा पृथ्वीवरील ऑप्टिकल आणि रासायनिक गुण दर्शवतो. हा हिरा पर्यावरण अनुकूलही आहे. कारण या हिऱ्याच्या निर्मितीसाठी पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा वापर करण्यात (PM Modi in US) आला आहे. तसेच राजस्थानमधील हाताने बनवलेलं 24 कॅरेट हॉलमार्कचं सोन्याचं नाणं, तसेच 99.5 टक्के कॅरेट चांदीचे नाणे. पंजाबचे तूप कर्नाटकातील मैसूरमधील चंदनाचा तुकडा, पश्चिम बंगालच्या कुशल कारागिरांनी तयार केलेले चांदीचे नारळ, गुजरातचे मीठ अशा अनेक भेटवस्तु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना गिफ्ट म्हणून दिल्या.

Share This News
error: Content is protected !!