Sylvester DiCunha Pass Away

Sylvester DiCunha Pass Away : ‘अमूल गर्ल’चे जनक सिल्व्हेस्टर डिकुन्हा यांचे निधन

316 0

मुंबई : ‘अमूल’ या दुधाच्या प्रसिद्ध ब्रँडला वेगळ्या उंचीवर नेणारे किमयागार सिल्व्हेस्टर डिकुन्हा (Sylvester DiCunha Pass Away) यांचे मंगळवारी रात्री मुंबईत निधन झाले. त्यांनी ‘अमूल’ ‘बटर’साठी ‘अटरली बटरली’ ही जाहिरात मोहीम 1966 मध्ये सुरू केली आणि त्यासाठी एक खट्याळ चेहऱ्याच्या, डोक्यावर एक रिबिन बांधलेली, फ्रॉक घातलेली आणि हातात ब्रेडचा एक स्लाइस घेऊन हसणाऱ्या मुलीचे रेखाचित्र त्यांनी तयार केले होते. डिकुन्हा यांची जाहिरात क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती म्हणून (Sylvester DiCunha Pass Away) वेगळी ओळख होती.

Surekha Punekar Join BRS : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत BRS मध्ये केला प्रवेश

सिल्व्हेस्टर डिकुन्हा हे ‘अमूल’बरोबर 1960 पासून संलग्न झाले. त्यांनी अमूल जाहिरातीत योजलेले लहान मुलीचे रेखाचित्र हीच ‘अमूल बटर’ची ओळख बनली आणि पुढे ही मुलगी ‘अमूल गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली. 1966 मध्ये ही अमूल गर्ल प्रथम जाहिरातीमध्ये झळकली. 1969 मध्ये देशात फोफावलेल्या हरे कृष्णा चळवळीवर डिकुन्हा यांनी भाष्य केले होते.

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्या प्रकरणातील संशयित राहूल हंडोरेला मुंबईतून अटक

त्या वेळी अमूलच्या जाहिरातीत त्यांनी ‘हरी अमूल हरी हरी’ ही ओळ वापरली, जी खूप गाजली होती. अमूल गर्लचे रेखाटन करणारे जयंत राणे आणि जाहिरात मजकूर लिहिणारे मनीष झवेरी यांची सिल्व्हेस्टर डिकुन्हा यांना चांगली साथ लाभली होती. डिकुन्हा यांना ‘अमूल इंडिया’च्या मार्केटिंग विभागाचे महाव्यवस्थापक पवन सिंग यांच्यासह उद्योगजगतातील अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!