Peru Gold Mine Fire

Peru Gold Mine Fire: सोन्याच्या खाणीला भीषण आग, 27 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

324 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेरू (Peru) या देशांमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या ठिकाणी असलेल्या एका सोन्याच्या खाणीला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये 27 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोन्याच्या खाणीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजत आहे. यान्क्विहुआ ही कंपनी हि सोन्याची खाण खाण चालवते. या घटनेबाबत कंपनीकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

त्या ठिकाणी स्थानिक रहिवाशी असलेल्या फिर्यादी जिओव्हानी माटोस यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याच्या खाणीला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 27 जणांना आपला जीव गमवावा लागला. यानक्विहुआ पोलिस स्टेशनकडून या घटनेची पुष्टी करण्यात आली आहे.

पेरू हा जगातील अव्वल सोन्याचा आणि तांबे उत्पादन करणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे. पेरूच्या ऊर्जा आणि खाण मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार 2000 नंतरची हि सर्वात मोठी प्राणघातक खाण दुर्घटना आहे. 2002 मध्ये पेरूमध्ये वेगवेगळ्या खाण अपघातामध्ये जवळजवळ 73 लोकांचा मृत्यू झाला होता.

Share This News
error: Content is protected !!