ठळक बातम्यामनोरंजनराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

OTT Rule : सरकारने OTT साठी बनवले ‘हे’ नियम; शिवीगाळ आणि अश्लीलतेवर येणार बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल लोक थिएटर आणि टीव्हीपेक्षा OTT प्लॅटफॉर्मला जास्त प्राधान्य देताना दिसत आहेत. ते मोठ्या प्रमाणात OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहण्यास प्राधान्य देतात. ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या नाही पाहीजे त्या गोष्टी या माध्यमातून दाखवल्या जातात. आता सरकार याबाबत मोठे पाऊल उचलणार आहे. या संदर्भात माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतल्यानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

काय म्हणाले अनुराग ठाकूर ?
OTT प्लॅटफॉर्म सध्या सर्व वयोगटातील लोक पाहत आहेत. जेणेकरून त्यांना चांगला वापरकर्ता अनुभव मिळेल, याची काळजी घेतली पाहिजे. अनुराग ठाकूर म्हणाले की, ओटीटी ब्रॉडकास्टर्सना त्यांच्या प्लॅटफॉर्मचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी करू नका असे सांगण्यात आले आहे. तसेच ते पुढे म्हणाले सरकार सर्जनशील स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय संस्कृती आणि समाजाचा अपमान होऊ देणार नाही. आशयाच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा अपमान होऊ दिला जाऊ शकत नाही.

JIO TV च्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणारं ‘TOP NEWS मराठी’ ठरलं देशातलं पहिलं डिजिटल चॅनेल !

ट्विटरवरून दिली माहिती
अनुराग ठाकूर यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. यामध्ये ते म्हणाले कि, सामग्री, वापरकर्ता अनुभव, विशेषतः अपंग लोकांसाठी सुलभता वाढवणे आणि या क्षेत्राची एकूण वाढ आणि नाविन्य यासह विविध मुद्दयांवर त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यांनी सांगितले की ओटीटी प्लॅटफॉर्म त्यांची जबाबदारी समजून घेतली पाहिजे यावर बैठकीत भर देण्यात आला. तसेच या बैठकीमध्ये अनुराग ठाकूर यांनी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नवीन श्रेणी – सर्वोकृष्ट वेब सीरिज’ पुरस्कार जाहीर केला. हा पुरस्कार ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मूळ वेब सिरीजला देण्यात येणार आहे. जी मूळत: शूट करण्यात आली आहे आणि भारतीय भाषेत उपलब्ध असेल अशी वेब सिरीज या पुरस्कारासाठी पात्र ठरणार आहे.