थिरुवअनंतपुरम : केरळच्या हायकोर्टाने एका प्रकरणी एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. स्त्रीच्या शरिराच्या वरच्या भागाला मूलतः लैंगिक किंवा आक्षेपार्ह भाग समजता कामा नये असे निरीक्षण केरळ हायकोर्टाकडून नोंदवण्यात आले आहे. यासाठी हायकोर्टानं पुरुषांच्या सर्वमान्य सवयींचा दाखला दिला आहे. तसेच महिलांबाबत ही बाब भेदभाव करणारी आहे असेदेखील हायकोर्टाने म्हंटले आहे.
एका खटल्यात एका आईवरील गुन्हे रद्द करताना हायकोर्टाने ही टिप्पणी केली आहे. ज्या महिलेवर हा गुन्हा दाखल करण्यात आला त्या महिलेने आपल्या मुलांच्या अर्धनग्न शरीर रंगवून एक व्हिडिओ तयार केला होता. या व्हिडिओवर आक्षेप घेत तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या महिलेने आपली बाजू मांडताना पितृसत्ताक कल्पनेला आव्हान देण्यासाठी आणि स्त्री शरीराच्या अतिलैंगिकीकरणाविरुद्ध संदेश देण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आल्याचे सांगितले. यावर हा व्हिडिओ आक्षेपार्ह नसल्याचे हायकोर्टाकडून सांगण्यात आले.