Bihar

मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या कुटुंबीयांनी थेट सासरी जाऊन लेकीला उचललं अन्…, (Video)

610 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमध्ये (Bihar) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका मुलीचे कुटुंबीय तिला तिच्या सासरच्या घरातून बळजबरी बाईकवरून घेऊन जाताना दिसत आहे. यानंतर मुलीच्या सासरच्या लोकांनी तिच्या माहेरच्या लोकांवर गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
या घटनेतील मुलीच्या घरचे तिने मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे नाराज होते. त्यामुळे त्यांनी अचानक मुलीच्या सासरच्या घरी जाऊन मुलीला बाईकवरुन बळजबरी उचलून आणले. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, दोन तरुण मुलीला बाईकवर बळजबरी लटकवून घेऊन जात आहे आणि ती मुलगी जोरजोरात ओरडत आणि रडत आहे.

या घटनेमुळे पीडित मुलीच्या सासरच्यांनी ऑनर किलिंग (Honor Killing) अंतर्गत मुलासह सूनेची हत्या करण्याची भीती व्यक्त करत गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याआधीही मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या वडिलांना मारहाण केली होती. ज्यामध्ये मुलाच्या वडिलांना आपला एक हाथ गमवावा लागला होता. त्यावेळीदेखील मुलीच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Share This News
error: Content is protected !!