Jammu And Kashmir

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक; 3 जवान शहीद

665 0

श्रीनगर : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 3 जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी लपून बसल्याची माहिती (Jammu and Kashmir) मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील हलान वनक्षेत्रात शोध मोहीम सुरू केली होती. या चकमकीत भारताच्या 3 जवानांना वीरमरण आलं आहे. अजूनही त्या परिसरात शोध मोहीम सुरू असल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे.

काय घडले नेमके?
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद झाले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. या ठिकाणी परिसराची नाकेबंदी करून शोध मोहीम राबवली जात आहे. हलान वनक्षेत्रात शोध मोहिम सुरु असताना दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. त्याला आपल्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. या गोळीबारात सुरक्षा दलाचे तीन जवान मृत्यू पावले आहेत.

“कुलगाममधील हलानच्या उंच शिखरांवर दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीवरून 4 ऑगस्ट 2023 रोजी सुरक्षा दलांनी ऑपरेशन हलान सुरू केले होते. दहशतवाद्यांसोबत झालेल्या गोळीबारात तीन जवान जखमी झाले आणि नंतर शहीद झाले,” अशी माहिती श्रीनगर-स्थित लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिली आहे.

बारामुल्ला येथील इमरान अहमद नजर, श्रीनगर येथील वसीम अहमद मट्टा आणि बिजबेहारा येथील वकील अहमद भट अशा 3 दशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या पथकाने या तिघांना गुप्तचर माहितीच्या आधारे शहरातील हरनाबल नातीपोरा येथील चेक पोस्टवरून अटक केली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तीन हातबॉम्ब, 10 राउंड पिस्तूल, 25 राउंड एके-47 रायफल आणि इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!