Pune News

Pune News : कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून व्यापाऱ्यास खंडणी मागणाऱ्या आरोपीस Unit-2 ने केले जेरबंद

765 0

पुणे : कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन गु र. क्र.128/2023 भादवि कलम 387,507 गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार गजानन सोनुने व पुष्पेन्द्र चव्हाण यांनी काही एक धागे दोरे नसताना तांत्रिक विश्लेषण,CCTV फूटेज तपासून तसेच गोपनीय माहितीद्वारे अनोळखी आरोपीचे नाव निष्पन्न करून सदर गुन्ह्यातील आरोपी नामे श्रीनाथ यलाप्पा शेडगे वय 25 धंदा – मजुरी रा. मुपो उंबरे (वेळापूर) ता. अकलूज जि. सोलापूर येथे त्याच्या मूळ गावी असल्याची माहिती मिळाली. सदरची बातमी हि गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी वपोनि नंदकुमार बिडवई यांना कळवली असता त्यानी युनिट 2 कडील पो.उप.नि नितीन कांबळे पो अं अमोल सरडे,पो अं पुष्पेन्द्र चव्हाण, पोअ गजानन सोनुने यांची टीम तयार करून त्यांना तात्काळ आरोपींचा शोध घेणेबाबत आदेश दिले.

त्याप्रमाणे नमूद टीम ही खाजगी वाहनाने उंबरे ( वेळापूर )ता.माळशिरस जिल्हा सोलापूर येथे जाऊन अकलूज पोलिसांची मदत घेऊन आरोपी नामे श्रीनाथ यलाप्पा शेडगे वय 25 यास ताब्यात घेऊन त्याने गुन्ह्यात वापरलेले वोडाफोन/आयडिया कंपनीचा सिम कार्ड क्रमांक 7350524023 ताब्यात घेऊन गुन्हे शाखा युनिट -2 पुणे शहर येथील कार्यालयामध्ये घेऊन आल्यानंतर त्यास पुन्हा विश्वासात घेऊन सखोल तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाई कामी कोरेगाव पार्क पो. स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 श्री. सुनील तांबे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई , यांचे मार्गदर्शनाखाली पो उप नि नितीन कांबळे, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, अमोल सरडे , गजानन सोनुने , पुषपेंद्र चव्हाण, उत्तम तारू, साधना ताम्हाणे, निखिल जाधव,मोसिन शेख,नागनाथ राख या पथकाने केलेली आहे.

Share This News

Related Post

Yavatmal Crime

Yavatmal Crime : शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या पिक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मनसेने दिला चोप

Posted by - March 15, 2024 0
यवतमाळ : शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत असतात. अशीच आणखी एक घटना यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातून समोर आली आहे.…

मोठी बातमी! अखेर 9 तासाच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात

Posted by - July 31, 2022 0
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊतांची आज सकाळपासून चौकशी सुरु होती. राऊतांविरोधात चौकशी करण्यासाठी…
Police Pune

Sushma Andhare : ‘उठा उठा देवेंद्रजी… गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली’ सुषमा अंधारेंनी ट्विट केलेल्या ‘त्या’ व्हिडिओने उडाली खळबळ

Posted by - November 9, 2023 0
पुणे : ललित पाटीलप्रकरणी आधीच पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushama Andhare)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *