I HATE INDIANS म्हणत अमेरिकेमध्ये वर्णद्वेषातून भारतीय महिलांना मारहाण ; व्हिडिओ व्हायरल …

273 0

टेक्सस : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ टेक्सास मधील असून अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी अत्यंत संताप जनक अशी घटना घडली आहे . या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला चार भारतीय महिलांच्या अंगावर धावून जाते आहे. एवढंच नाही तर अश्लाघ्या भाषेत त्यांना शिवीगाळ देखील करते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , ही घटना बुधवारी रात्री टेक्सासच्या डेल्लास या शहरांमध्ये घडली . चार भारतीय वंशाच्या महिला एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर पार्किंगच्या दिशेने येत होत्या. याचवेळी अचानक एका अज्ञात मेक्सिकन अमेरिकन वंशाच्या महिलेने या भारतीय वंशाच्या महिलांना अपशब्द वापरून शिवीगाळ देखील केली आहे.

दरम्यान या भारतीय वंशाच्या महिलांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ मोबाईल मध्ये शूट केला आहे. वर्णद्वेषातून या महिलेने संकट ओढवून घेतले आहे. या महिलेची ओळख पटली असून ती टेक्सासच्या प्लानो शहराची रहिवासी असल्याचे समजते. या महिलेला पोलिसांनी अटक केली असून दहा हजार अमेरिकन डॉलर्सचा दंड देखील ठरवण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!