National Space Day

National Space Day : केंद्र सरकारची मोठी घोषणा; 23 ऑगस्ट ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ होणार साजरा

1507 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्रोच्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग करत भारताने एक नवा इतिहास (National Space Day) रचला. भारताचं चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झालं. आता इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव म्हणून 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. अशी अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली आहे.

23 ऑगस्ट ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’
23 ऑगस्ट 2023 रोजी इस्रोच्या चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला. यश साजरं करण्यासाठी आणि या ऐतिहासिक कामगिरीची आठवण म्हणून केंद्र सरकारने दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून घोषित केले. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशामुळे अमेरिका, चीन आणि तत्कालीन सोव्हिएत युनियननंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला.

केंद्र सरकारने अधिसूचनेत काय म्हंटले?
केंद्र सरकारने गॅझेट अधिसूचनेत म्हटलं आहे की, “23 ऑगस्ट हा देशाच्या अंतराळ मोहिमांमधील प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान-3 मोहिमेच्या यशस्वीतेसह विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर तैनात केल्यामुळे, भारत हा चंद्रावर उतरणारा चौथा देश बनला आहे आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार पहिला देश. या ऐतिहासिक मोहिमेचा परिणाम मानवजातीला पुढील काही वर्षांमध्ये लाभदायक ठरेल. हा दिवस देशाच्या अंतराळ मोहिमांमधील प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा टप्पा तरुण पिढ्यांना यातील वाढीव आवड निर्माण करण्यासाठी प्रेरित करतो. STEM म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताचा पाठपुरावा करण्यासाठी वाढीव स्वारस्यासाठी प्रेरित करते आणि अंतराळात क्षेत्रात मोठी प्रेरणा आणि मोठी चालना देतो. या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस “राष्ट्रीय अंतराळ दिन” म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Share This News

Related Post

Poisoning

Poisoning : धक्कादायक ! सांगलीच्या आश्रमशाळेमध्ये जेवणातून 170 मुलांना विषबाधा

Posted by - August 28, 2023 0
सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातल्या उमदी येथील आश्रम शाळेतील मुलांना विषबाधा (Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे 170…

मागील वर्ष ठरले रा. स्व. संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष – नाना जाधव

Posted by - March 15, 2023 0
पुणे : मागील वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीने कार्यविस्ताराचे सकारात्मक वर्ष होते. येत्या दोन वर्षात पश्चिम महाराष्ट्र प्रांतात अधिक जोमाने…

Breaking News ! राहुल गांधी, सोनिया गांधी यांना ईडीचे समन्स, काय आहे प्रकरण ?

Posted by - June 1, 2022 0
नवी दिल्ली- नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशीसाठी राहुल गांधी, सोनिया गांधी यांना समास पाठवले आहे. 8 जून रोजी हजर राहण्याचे आदेश…

Mumbai to Ahmedabad : बुलेट ट्रेन 2026 पर्यंत धावणार

Posted by - July 21, 2022 0
मुंबई – राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदी विराजमान होताच बहुचर्चित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन बाबत पुन्हा…

मोठी बातमी :… म्हणून नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल केला ! नाना पटोलेंवर केले गंभीर आरोप, वाचा सविस्तर

Posted by - February 4, 2023 0
नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षावर अनेक गाम्भी आरोप केले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *