Breaking News

जनरल व्ही. के सिंग पोहोचले युक्रेन-पोलंड सीमेवर; विद्यार्थी लवकरच पोहोचणार मायदेशी

184 0

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी चार केंद्रीय मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये पाठवण्यात आले आहे. त्यात रस्ते वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंग पोलंडमध्ये पोहोचलेत. युक्रेनमधून भारतीय मोठ्या संख्येनं पोलंडच्या सीमेवर दाखल झाले आहेत. रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमधील परिस्थिती गंभीर होत चाललीय.

अशा परिस्थितीत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून ‘ऑपरेशन गंगा’ अभियान राबवलं जातंय. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना पोलंडकडून मदतीचा हात मिळतोय.

केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी पोलंडमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी चर्चा केली असून त्यांना सुखरुप मायदेशी नेणार असल्याचे आश्वासनही दिले आहे. यावेळी भारताचे पोलंडमधील राजदूत नगमा मल्लिक हे उपस्थित होते.

 

युक्रेनमधून हे विद्यार्थी पोलंडच्या सीमेपर्यंत आले असून त्यांना लवकरच पोलंडमध्ये प्रवेश देण्यात येईल आणि सुखरुप मायदेशी परत आणण्यात येईल असे जनरल व्ही. के. सिंह यांनी ट्विट करून सांगितले आहे.

Share This News
error: Content is protected !!