विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीत न होताच राज्यपाल निघून गेले आहेत. सभागृहातील घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी भाषण गुंडाळलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई आणि जोतिबा फुलेंचा अपमान केल्याचा ठपका ठेवत राज्यपालांविरोधात सत्ताधारी पक्ष विधीमंडळातआक्रमक झाल्याचं दिसून आलं. पायऱ्यांवर सत्ताधार्यांकडून राज्यपालांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ अशा घोषणाही देण्यात आल्या.
राज्यपाल आल्यानंतर ‘असा’ घडला घटनाक्रम
राष्ट्रगीतानंतर भाषणाला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांचा उल्लेख केला तेंव्हा ‘शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणाबाजी सुरु झाली.मुख्यमंत्र्यांनी हात वर करुन घोषणा थांबवण्याची विनंती केली.त्यानंतर मग ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा देण्यात आल्या.नवाब मलिकांविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. राज्यपालांनी या गोंधळातच भाषण उरकलं आणि फाईल बंद करून निघून गेले.त्यांच्या अनुपस्थितीच राष्ट्रगीत झाले.
महाराष्ट्राच्या विधानसभेचं अर्थसंकल्पी अधिवेशन सुरु होत आहे.3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.
अशातच अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांकडून रणनिती आखली जात आहे.