दक्षिण चीनमध्ये डोंगरावर कोसळलेल्या चीन इस्टर्न एअरलाइन्सच्या फ्लाइट MU5735 चे सर्व 123 प्रवासी आणि नऊ क्रू मेंबर्स अशा सर्व 132 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, असे देशाच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने शनिवारी सांगितले.
चीनच्या गुआंक्सी प्रांतात चायना ईस्टर्न विमान कंपनीचे बोइंग 737 कोसळले होते. या विमानात कर्मचाऱ्यांसह 132 प्रवाशांचा समावेश होता. सोमवारी दुपारी हे विमान डोंगरात कोसळले. अपघातस्थळ परिसरात पाऊस सुरू असल्याने तपासणी मोहीम थांबवण्यात आली होती.