सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी राजकीय आरक्षणाचा आंतरिम अहवाल फेटाळल्या नंतर आता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू झाले असून ओबीसी आरक्षणाबावत सरकारचं वेळकाढू धोरण सुरू असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले न्यायालयानं फटकरल्यानंतर राज्य सरकारला जाग आली असून या सरकारला ओबीसी राजकीय आरक्षण द्यायचं नाही आहे असा घणाघात केला
निवडणुका झाल्यानंतर सरकार ओबीसी राजकीय आरक्षणाचा कायदा करणार का ? असा सवाल देखील फडणवीस यांनी उपस्थित केला