सर्वोच्च न्यायालयानं राज्य मागासवर्गीय आयोगाचा आंतरिम अहवाल फेटाळून लावल्यानंतर आता अर्थसंकल्प अधिवेशनात जोरदार घामासांग सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर आज विधानसभेत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जोरदार शाब्दिक चकमक झाली.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप केवळ राजकारण करत असल्याची टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केल्यानंतर ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारनं पुरेसा अभ्यास करून अहवाल तयार केला नसून राज्य सरकार केवळ टोलवाटोलवी करत असल्याचा पलटवार फडणवीस यांनी केला.