Manoj Jarange

Manoj Jarange : आरक्षणासाठी कोणी काय केलं, 24 डिसेंबरनंतर सगळंच सांगणार; मनोज जरांगेंनी दिला इशारा

1714 0

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. उद्यापासून ते महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार आहे. मात्र, यापूर्वी त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “मराठा समाजाने आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा डाव मोडून काढला आहे. सर्वच जिल्ह्यात नोंदी सापडत आहेत. त्यामुळे 35 ते 40 टक्के लोकांना प्रमाणपत्र मिळाले आहे. तर, आरक्षणासाठी कोणी काय केलं हे 24 डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार असल्याचे,” जरांगे म्हणाले आहेत.

मागील 75 वर्षात कोणी काय केले हे 24 डिसेंबरनंतर आम्ही समाजाच्या पुढे मांडणार आहे. त्यातून सुट्टी होणार नाही. कोणी काय-काय केलं हे आम्ही काढून ठेवत असून, 24 डिसेंबरनंतर मांडणार आहे. पण, सध्या आमच्या हक्काचे आरक्षण आम्हाला द्यावे हीच भूमिका आमची असणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.

कसा असेल उद्याचा मनोज जरांगेचा दौरा ?
मनोज जरांगे उद्यापासून पुन्हा एकदा राज्याचा दौरा करणार आहे. पहिल्याच दिवशी त्यांच्या तीन ठिकाणी सभा होणार आहे. सकाळी 11 वाजता मनोज जरांगे आंतरवाली सराटी गावातून निघणार आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ईट येथे त्यांची पहिली सभा होणार आहे. त्यानंतर परंडा तालुक्यातील परंडा शहरात सभा होईल. तर, शेवटची तिसरी सभा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा वांगी नंबर 1 येथे होणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!