Weather Forecast

Weather Update : राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट तर ‘या’ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण

529 0

मुंबई : राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला आहे तर काही भागात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या उन पावसाचा खेळ सुरू असतानाच आता हवामान खात्याने जिल्ह्यांना एक नवा अलर्ट जारी केला असून राज्यात बहुतांश जिल्ह्यात वादळी वारा, पाऊसासह वीजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण असले तरी मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. वाशीममध्ये 42.2 °C कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

‘या’ जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट-

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदर्ग, सोलापूर, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ

‘या’ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण-

चंद्रपूर, गडचिरोली आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोलीमध्ये वाऱ्यासह ढगाळ वातावरण राहणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Nandurbar Loksabha : नंदुरबार मतदारसंघात नवीन ट्विस्ट; भारत आदिवासी पार्टीकडून उमेदवार जाहीर

मोठी बातमी! अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्य सरकार कडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा

Loksabha :’या’ 12 लोकसभा मतदारसंघात रंगणार शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक सामना

Loksabha : भाजपचा पहिला विजय; ‘हा’ उमेदवार निवडणूक न लढता बनला खासदार

Sangli Loksabha : सांगलीत मविआला धक्का ! विशाल पाटलांची मनधरणी करण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याने राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Vinod Patil : छ. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आला नवा ट्विस्ट; विनोद पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Loksabha : राष्ट्रवादी अजित पवार गटाचा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Share This News
error: Content is protected !!