Pune Rain News

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात आज कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला नवा अलर्ट

2079 0

मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसानं (Maharashtra Rain Alert) झोडपून काढलं आहे, गेल्या काही दिवसांपासून पाऊस सूरूच आहे. याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे विदर्भात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान विभागाकडून अकोला, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, जालना, सातारा, पुणे या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Porsche Accident: ‘वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली’; अल्पवयीन आरोपीकडून धक्कादायक माहिती उघड

Pune Accident: फरार बिल्डर विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!