मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये (Weather Update) गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. यामुळे काही ठिकाणी गारवा निर्माण झाला आहे. तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा तसेच हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट
पुणे, सातारा, अहमदनगर, छ. संभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Supriya Sule : अजित पवारांनी केलेल्या ‘त्या’ टीकेला सुप्रिया सुळेंनी दिले चोख उत्तर
Sahil Khan : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला अटक
Sharad Pawar : डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात