ऊर्जामंत्र्यांसोबतची आजची बैठक रद्द झाल्यानं वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची शक्यता

155 0

एकीकडे एसटीच्या संपामुळे राज्यातल्या ग्रामीण भागांना फटका पडत आहे. त्यात आता आणखी एका संपाचं संकट राज्यावर उभं ठाकलंय.

मात्र यावेळी हे संकट केवळ शहरी भागही कवेत घेण्याची शक्यता आहे. कारण वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुढच्या 2 ते 3 दिवसांत महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण काल (सोमवारी) सुरू झालेला वीज कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी ऊर्जामंत्र्यांसोबत मुंबईत काल बैठक झाली.

पण ती बैठक निष्फळ ठरली आहे. शिवाय आज (मंगळवारी) ऊर्जामंत्र्यांसोबत होणारी बैठकही रद्द करण्यात आली आहे.

वीज निर्मिती आणि कोळसा पुरवठा करणाऱ्या अनेक केंद्रांवरच्या संघटनांनी संप पुकारल्यानं विजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोयना धरणाचं पायथा विद्युतगृह बंद पडलं आहे. त्यामुळं संपावर तोडगा न निघाल्यास वीजटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share This News

Related Post

नात्याला काळिमा फासणारी घटना : घरी खेळायला आलेल्या 2 वर्षाच्या चिमुरडीवर 65 वर्षीय आजोबाचा अत्याचार; अहमदनगर मधील धक्कादायक घटना

Posted by - February 20, 2023 0
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरी खेळायला आलेल्या एका दोन वर्षाच्या चिमूरडीवर…

नगरपरिषदा व नगर पंचायतीतील अध्‍यक्ष जनतेतून थेट निवडणूकीद्वारे निवडा; सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Posted by - July 8, 2022 0
मुंबई: राज्‍यातील नगरपरिषदा व नगर पंचायतीतील अध्‍यक्ष जनतेतून थेट निवडणूकीद्वारे निवडावे तसेच ग्राम पंचायतींचे सरपंच सुध्‍दा जनतेतुन थेट निवडणूकीद्वारे निवडावे…
Bank Holiday

Bank Holiday : बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मार्चमध्ये ‘एवढे’ दिवस बँक राहणार बंद

Posted by - February 25, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही जर मार्चमध्ये बँकेचे व्यवहार करणार (Bank Holiday) असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी असणार…
Satara News

Satara News : संपूर्ण गाव हळहळलं ! पोहता येत नसल्याने दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत

Posted by - December 5, 2023 0
सातारा : सातारा जिल्ह्यातून (Satara News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील हिवरे (ता. कोरेगाव)…

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे डॉ. राजेंद्र सिंह, जी. रघुमान व डॉ.अशोक गाडगीळ यांना  भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Posted by - February 3, 2024 0
पुणे, दि.३ फेब्रुवारी: “ सृष्टीच्या कल्याणासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी यांना निसर्गाप्रती संवेदनक्षम होण्याची गरज आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *