महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होत असून या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषद अर्थसंकल्प सादर करत आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहास कळवा यासाठी पुणे, मुंबई नागपूर याठिकाणी हेरिटेज वॉक निर्माण करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
त्याच बरोबर मुंबई हैद्राबाद दरम्यान बुलेट ट्रेन साठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार असल्याचं देखील पवार यांनी यावेळी सांगितलं