स्वरसम्राज्ञीची स्वरयात्रा विसावली ; भारताच्या गान कोकिळा लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली – अभाविप

151 0

भारताची ‘गान कोकिळा’ लता मंगेशकर यांचे आज दि.०६ फेब्रुवारीला मुंबई येथे वयाच्या ९२ व्या वर्षी दु:खद निधन झाले. काही दिवसापूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या महिनाभरापासून त्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा न दिसून येत नव्हती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

अनेक ख्यातनाम संगीतकारांची, सुमारे १८०० हून अधिक चित्रपटांतील विविध प्रकारची २२ भाषांतील गाणी त्यांनी गायली आहेत. त्यांची संख्या सुमारे २५ ते ३० हजारांपर्यत आहे. लता दीदींचा सर्व प्रकारच्या जागतिक विक्रमांची नोंद करणाऱ्या गिनीज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ’जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ म्हणून उल्लेख आहे.
लता मंगेशकर यांनी ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केले. त्या भारताच्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक होत्या. भारतीय संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखले जाते. १९४२ मध्ये लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली आणि गेल्या सहा दशकांपेक्षा अधिक काळापासून त्यांची ही कारकीर्द टिकून आहे. लता दीदींच्या कार्याचा गौरव करत केंद्र शासनाच्या वतीने त्यांना १९६९ ला पद्मभूषण, १९९९ मध्ये पद्मविभूषण व २००१ ला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देण्यात आला.
अभाविप महाराष्ट्र प्रदेशमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी लतादीदीच्या निधनावर शोक व्यक्त करतांना सांगितले कि, “लतादीदींच्या जाण्याने संगीत क्षेत्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. स्वरसम्राज्ञीची स्वरयात्रा विसावली. ईश्वर लतादीदींच्या पुण्यात्मा ला सद्गती देवो व त्यांचे कुटुंबीय व असंख्य चाहत्यांना लतादीदीच्या निधनाने दु:ख पेलण्याची शक्ती प्रदान करो.”

Share This News

Related Post

पुणेकर घेणार मेट्रो प्रवासाचा आनंद ! दिवसाला किती मेट्रो धावणार ? जाणून घ्या वेळापत्रक

Posted by - March 2, 2022 0
पुणे- महामेट्रोचे पुण्यात पहिल्या टप्यातील मार्गाचे काम पूर्ण झाले असून, त्याच्या उदघाटनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अवघ्या सहा दिवसांत…

Breaking News : हवेली तहसीलदार तृप्ती कोलतेंवर निलंबनाची कारवाई

Posted by - December 9, 2022 0
पुणे : हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मौजे हडपसर येथील जमिनीबाबतच्या एका गैरव्यवहारा प्रकरणी त्यांच्यावर…

शिवसेनेच्या ठाणे जिल्हा प्रमुखपदी केदार दिघेंची नियुक्ती ?

Posted by - June 27, 2022 0
राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी सुरू असून एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून शिवसेनेचे 41 आमदारांसह ते गुवाहाटी दाखल झाले…
Aundhkar

बिल्डरकडे 2.50 लाखांची मागणी करणारा ‘हा’ अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Posted by - May 17, 2023 0
सांगली : विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या (Anti-corruption) अधिकाऱ्यांनी रंगेहाथ (Raid Hand) पकडले आहे. विनायक औंधकर (Vinayak Aundhkar)…
Tuljabhavani Temple

तुळजाभवानीचं दर्शन घेणाऱ्यांसाठी मंदिर प्रशासनाने घातली ‘ही’ अट

Posted by - May 18, 2023 0
धाराशिव : तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani Temple) संस्थानने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आता मंदिर प्रशासनाने नवीन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *