सोशल मीडियावर रिंकू राजगुरुसोबत लग्नाची चर्चा; कोण आहेत कृष्णराज महाडिक?

695 0

कोल्हापूर भाजपाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव कृष्णराज महाडिक आणि सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या विषय फक्त फोटो व्हायरल झाला या गोष्टीचा नाही तर फोटोमुळे कृष्णराज महाडिक यांच्या लग्नाच्या चर्चांनीदेखील जोर धरला आहे. कोल्हापुरात महाडिक घराण्याच मोठं प्रस्थ आहे. याच कारणामुळे कृष्णराज महाडिक यांचा देखील कोल्हापुराच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात वावर असतो. हे कृष्णराज महाडिक नेमके आहेत तरी कोण पाहूयात त्यांच्यावरचा हा रिपोर्ट.

कृष्णराज महाडिक ( Krishnaraj Mahadik ) राजकारणात फार सक्रिय नसले तरी त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. विशेष म्हणजे ते एक युट्यूबर आहेत. Krish Mahadik नावाचं त्यांचं युट्यूब चॅनल आहे. यावर त्यांचे सहा लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. सोशल मीडियावर ते प्रचंड सक्रिय असतात. कृष्णराज महाडिक आंतरराष्ट्रीय कार रेसरही आहेत. अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय गो-कार्टिंग चॅम्पियनशीप जिंकली. यानंतर कृष्णराज यांनी 2012 आणि 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय कार्टिंग इव्हेट रोटॅक्स मॅक्स वर्ल्ड ग्रँड फायनलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. असं करणारे ते एकमेव भारतीय होते.

Share This News
error: Content is protected !!