माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या बातम्या येत होत्या. या बातमीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती.मात्र प्रत्यक्षात सावंत यांच्या मुलाच अपहरण झालंच नव्हतं. दररोज दहा पंधरा वेळा बोलणं होणारा मुलगा अचानक न सांगता गेलाच कसा या चिंतेने तानाजी सावंत यांनी सूत्र फिरवली आणि यंत्रणा कामाला लावली. नेमकं काय घडलं? सावंतांचा मुलगा कुठे गेला होता. त्याला परत कसं आणलं. या घटनाक्रमाची इनसाईड स्टोरी पाहूयात…
तानाजी सावंत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ऋषिराज आणि माझ्यात कोणताही वाद झाला नाही. आम्ही रात्री गप्पा मारल्या. प्रदोष असल्यामुळे पहाटे ऋषिराजने रुद्राभिषेक केला. त्यानंतर आम्ही आपापल्या कामाला गेलो. ऋषिराज आठ दिवसांपूर्वीच दुबईला गेला होता. मग तो अचानक पुन्हा बँकॉकला कसा केला, हा प्रश्न मला पडला होता. दिवसातून आमचे अनेकदा फोनवर बोलणे होते. मग हा एअरपोर्टला अचानक का गेला, हे मला समजत नव्हते. त्यामुळे आम्ही चिंतेत होतो. त्याच्यासोबत त्याचे मित्र होते. पण पप्पा रागवतील का, या भीतीने त्याने मला काही सांगितले नाही का, हे आता त्याच्याशी बोलल्यानंतर कळेल असं तानाजी सावंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितल.