बीड : आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. यानिमित्ताने सकाळपासून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीतील वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीय.
मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. झेंडूसह गुलाब, मोगरा अशा विविध फुलांच्या सुंदर आरासने मंदिर फुलून गेलय.परिसर भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळतंय. वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्यच नाही तर देशातील विविध ठिकाणचे भाविक मंदिर परिसरात गर्दी करत आहेत. त्यामुळे भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने देखील व्यवस्था केलीये. सीसीटीव्हीद्वारे पोलिसांची करडी नजर ठेवण्यात आली आहे.