नाशिक : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे संस्थापक सदस्य व राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते राम गायटे (वय 97) (Ram Gayte) यांचे द्वारका येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या (Ram Gayte) पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राज्य कर्मचारी संघटनेचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, हुतात्मा स्मारकातील कार्यकर्ते, बँकिंग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Jalgaon Suicide : मम्मी, पप्पा…सॉरी… अशी चिट्ठी लिहून उच्चशिक्षित तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल
राम गायटे यांचे कार्य
निफाडमध्ये असताना राम गायटे काँग्रेसचे काम करत होते. कालांतराने राष्ट्रसेवा दलाचे विचार पटल्याने त्यांनी या कार्यात स्वतःला झोकून दिले. यादरम्यान त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. त्यानंतर त्यांना एस. एम जोशी, अच्युतराव पटवर्धन, रावसाहेब पटवर्धन, वसंत बापट यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. वंचितांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करीत त्यांनी शाळा काढल्या. शिक्षण खात्यात नोकरीला असताना कर्मचाऱ्यांना काय अडचणी येतात, याची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी नगरचे दिनकरराव कलवंड,र. ग. कर्णिक यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्र पिंजून सरकारी कर्मचारी संघटनेची स्थापना केली. यात वेळोवेळी सरकारी कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी सरकारदरबारी लढा दिला.
त्यांनी (Ram Gayte) यादरम्यान 11 ऑगस्ट 1966 रोजी स्वतः स्थापन केलेल्या संघटनेच्या माध्यमातून राज्यव्यापी संप केला. या संपाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद बघून पु. ल. देशपांडे यांनीदेखील राम गायटे यांचे कौतुक केले होते. त्यानंतर 1970 मध्ये दुसरा संप केला. या वेळी सरकारने कार्यकर्त्यांची धरपकड केली. यात भूमिगत राहून त्यांनी या संपाला बळ दिले होते.