मांजरी आणि तेरणा धरणातून पाणी सोडण्याविषयी सुयोग्य नियोजन करा – अमित देशमुख

462 0

लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील मांजरा, तेरणा धरणाच्या लाभ क्षेत्रातील कालव्यामधील पाणी तूट कमी करण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात, जेणेकरून कालव्यातून शेवटच्या लाभधारकापर्यंत पाणी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी आज कालवा समिती बैठकीत पाटबंधारे विभागाला दिले.

येत्या 23 मार्चपासून उन्हाळी हंगामाचे पहिले आवर्तन सोडण्यात यावे असा निर्णय कालवा समितीत सदस्यांच्या संमतीने घेण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्ह्यातील कालवा समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी उस्मानाबाद खासदार ओमराजे निंबाळकर,लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, औसा आमदार अभिमन्यू पवार, आमदार नमिता मुंदडा, आमदार कैलास पाटील, आमदार ज्ञानराज चौघुले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अधीक्षक अभियंता श्री म्हेत्रे, आदी विविध विभागाच्या विभाग अधिकारी यांची उपस्थिती होती.

Share This News
error: Content is protected !!