टोयोटा किर्लोस्कर मोटरने बुधवारी इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीसह पायलट प्रोजेक्टचा भाग म्हणून, भारतातील पहिले ऑल-हायड्रोजन इलेक्ट्रिक वाहन मिराई लाँच केले.
टोयोटा मिराई ही जगातील पहिली हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल आहे.
आणि ती शुद्ध हायड्रोजनपासून निर्माण होणाऱ्या विजेवर चालते. याला शून्य-उत्सर्जन करणारे वाहन देखील मानले जाते, कारण कार टेलपाइपमधून केवळ पाणी उत्सर्जित करते.
रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या हायड्रोजनवर चालणाऱ्या आधुनिक फ्युअल सेल इलेक्ट्रिक व्हेईकलच्या पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ झाला. संपूर्ण टाकी फुल केल्यानंतर ही कार तब्बल 650 किमी अंतर कापेल. लक्झरी वाहनांमध्ये हायड्रोजन कारचा समावेश होणार आहे. या पायलट प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, महेंद्र नाथ पांडे, आरके सिंग आणि टोयोटाचे अधिकारी उपस्थित होते.
Launching India's first Hydrogen based advanced ‘Fuel Cell Electric Vehicle (FCEV)’ – Toyota Mirai https://t.co/2lHYpNtXrR
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) March 16, 2022