राज्यात उन्हाचा तडाखा कायम ; विदर्भात उष्णतेची लाट

83 0

निरभ्र आकाश आणि देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. विदर्भात उष्णतेची लाट आली असून, ती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागातील किमान तापमान अद्यापही सरासरीपुढे आहे.

 

पुढील दोन दिवसांनंतर मात्र तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. राज्यात १३ मार्चपासून तापमानातील वाढ सुरू झाली होती. राजस्थानपासून गुजरातपर्यंत असलेल्या उष्णतेच्या लाटेचा परिणाम म्हणून मुंबई परिसरासह कोकण विभागात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली होती. मुंबई परिसराचे कमाल तापमान सरासरीच्या तुनलेत ५ ते ६ अंशांनी वाढले होते. सध्याही मुंबई परिसरातील कमाल तापमान सरासरीच्यचा तुलनेत अधिक आहे. राजस्थान, दक्षिण मध्य प्रदेश आणि तेलंगणा आदी राज्यांमध्ये सध्या उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे. विदर्भातही काही भागात उष्णतेची लाट आली आहे. जवळपास सर्वच भागातील कमाल तापमान ४० अंशांपुढे गेले आहे.

Share This News

Related Post

#DHULE : काजू समजून खाल्ल्या चंद्रज्योतच्या विषारी बिया; धुळ्यात 7 चिमुरड्यांना विषबाधा

Posted by - February 3, 2023 0
धुळे : काजू समजून चंद्रज्योती या फळाच्या बिया खाल्ल्यामुळे 7 मुलांची प्रकृती अस्वस्थ झाल्याची घटना काल धुळे तालुक्यातील बोरकुंड गावात…
Sonia Gandhi Health

Sonia Gandhi Health : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

Posted by - September 3, 2023 0
मुंबई : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना (Sonia Gandhi Health) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ताप आल्यानं सोनिया…
Eknath Shinde

Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Posted by - March 2, 2024 0
मुंबई : 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय सेवानिवृत्ती वेतन (Pension) योजना राज्यात…
NCP

NCP : राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाकडे शरद पवार गटाने केला ‘हा’ मोठा दावा

Posted by - November 9, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागच्या काही वर्षांमध्ये राज्यात मोठया घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी (NCP) पक्षामध्ये मोठी फूट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *