पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसह (Ajit Pawar) 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. अजित पवार यांचा गट सत्तेमध्ये सहभागी झाल्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी पसरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Saisha Bhoir : साईशा भोईरने ‘या’ कारणामुळे सोडली मालिका; ‘ही’ बालकलाकार करणार रिप्लेस
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने अजितदादांकडून पुण्याच्या पालकमंत्री पदावर दावा ठोकण्याची शक्यता आहे.अजित पवार यापूर्वी पुणे जिल्हाचे तीन वेळा पालकमंत्री राहिले आहेत. पुणे जिल्हा हा भाजपासाठी सत्ताकेंद्राबरोबर विचाराचे केंद्र राहिले आहे. त्यामुळे संघाच्या मुशीतून तयार झालेले भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुणे जिल्हाचे पालकमंत्रीपद राहील की नव्याने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या आणि प्रशासनावर पकड असलेल्या अजित पवार यांच्याकडे जाईल याची पुण्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. यापूर्वी 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यावेळी भाजपच्या विचार परिवारातून या निर्णयावर टीका करण्यात आली होती.
Beed News : गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ड्युटीवर जाताना दोघा प्राध्यापकांचा जागीच मृत्यू