आज 8 मार्च जागतिक महिला दिन.या दिवसाचं औचित्य साधत आज महिला शाहीरांनी छत्रपती शिवरायांना शाहिरीतून मानवंदना वाहिली आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बाल कल्याण समिती पुणे आणि शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधिनीच्या महिला शाहिरांनी महानगरपालिकेच्या प्रांगणातील नवीन स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढे शाहिरीतून मानवंदना वाहिली आहे.
स्त्रिया पुरुषांशी समांतर कार्य करण्यास सक्षम आहेत अशा भावना यावेळी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष हेमंत मावळे यांनी व्यक्त केल्या.