Shinde And Ration

Ration : आता रेशनसाठी दुकानात जाण्याची गरज नाही; शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

742 0

मुंबई : मंत्रालयात राज्य सरकारच्या (Shinde Government) पार पडलेल्या बैठकीत रेशन (Ration) वाटपाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार आता लाभधारकांना रेशनसाठी (Ration) स्वस्तधान्य दुकानात जाण्याची गरज भासणार नाही. फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून आता पात्र लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर राज्यात लवकरच ‘रेशन आपल्या दारी उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.

रेशनिंग तांदुळ छुप्या पद्धतीने विकणाऱ्यांवर कारवाईची मागणी ; लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

‘रेशन आपल्या दारी’ उपक्रम होणार सुरु
‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या धर्तीवर राज्यात ‘रेशन (Ration) आपल्या दारी हा उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याबाबत मंत्रालयीन बैठकीमध्ये अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी निर्णय घेतला आहे.या निर्णयानुसार आता लाभार्त्यांना रेशन दुकानात जाण्याची गरज लागणार नाही, तर फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून त्यांना अन्नधान्य वितरण करण्यात येणार आहे. मुंबई-ठाण्यात मोबाईल व्हॅनमार्फत शिधा वाटप करण्यात येणार आहे.

पर्वती मतदार संघाच्या रेशनिंग कमिटीची मीटिंग तातडीने घ्या-अश्विनी कदम

‘लाभार्थ्यांना वंचित न ठेवण्याचे आदेश
दरम्यान जे पात्र लाभार्थी आहेत, त्यापैकी कोणालाही अन्न धान्यापासून वंचित ठेवू नका असे आदेश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी शिधावाटप (Ration) अधिकाऱ्या्ंना दिले आहेत.

Share This News
error: Content is protected !!