राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना (Ganpati News) करण्यात आली मात्र महाराष्ट्रात असं एक गाव गाव आहे ज्या गावामध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जात नाही नेमकं हे गाव कोणतं आहे आणि यामागची आख्यायिका काय आहे पाहूयात…
महाराष्ट्राचा गणेशोत्सव आणि त्यातही कोकणाचा गणेशोत्सव हा सर्वांसाठी प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो मात्र कोकणातीलच रायगड जिल्ह्यातील असं एक गाव आहे की ज्या गावात कुणाच्याही घरी गणपतीचे प्राणप्रतिष्ठापना केली जात नाही या गावाचे नाव आहे. ‘साले’ माणगावपासून चार किमी आणि मुंबई-गोवा महामार्गापासून दीड किमी अंतरावर ‘साले’ गाव वसले आहे. या गावाला भोनकरांचे गाव म्हणूनही ओळखले जाते.
‘साले’ गावात कुणाच्याही घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही, पण गणेशोत्सवाला चाकरमानी आपल्या गावात येतात. जर गावात गणपती बसवला तर अरिष्ट येते अशी या साले गावकऱ्यांची धारणा आहे त्यामुळे गावाच्या हद्दीत कुणीही गणपती आणत नाही. मुंबई, पुणे येथून मोठ्या प्रमाणात या गावात भक्त जातात. ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना महाराष्ट्रात काही काळ राबवण्याचा प्रयत्न झाला होता, पण ‘साले’ गावात खूप वर्षांपासून ही परंपरा पाळली जाते.