मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai Highcourt) एका विवाहित महिलेने तिच्या पतीविरोधात दाखल केलेल्या गुन्हा रद्द करताना एक महत्त्वपूर्ण असं निरीक्षण नोंदवले आहे. न्यायालयाच्या निरीक्षणानुसार सासरकडच्यांनी विवाहित महिलेच्या स्वयंपाकाबद्दल नकारात्मक टिप्पणी करणे भारतीय दंड मी त्याच्या कलम 498 A अन्वये क्रूरतेचे कृत्य ठरत नसल्याचे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. या निरीक्षणासोबतच एका महिलेने पतीच्या नातेवाईकांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात आला आहे.
महिलेने आपल्या तक्रारीत नेमके काय म्हटले?
या महिलेचा विवाह 13 जुलै 2020 रोजी झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नानंतर काही महिन्यांनी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये सासरच्या मंडळींनी या विवाहितेला घराबाहेर काढलं सदर महिलेने लग्न झाल्यापासून एकदाही वैवाहिक संबंध प्रस्थापित न केल्याचा दावा तिने केला होता. तसेच सासरी पतीचे भाऊ स्वयंपाक करता येत नाही असे टोमणे मारत होते इतकाच नव्हे तर आई-वडिलांनी काही शिकवलं नाही असे टोमणे देखील सासरच्या मंडळींनी मारल्याचे तीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या महिलेकडून करण्यात आलेल्या या दाव्याचा अर्थात नकारात्मक टीप्पणीचा उल्लेख मात्र क्रूरतेच्या संदर्भात येत नाही. भारतीय दंड संविधानाच्या कलमान्वये ही क्रूरता नसल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने महिलेचे दावे फेटाळत सासरच्यांना दिलासा दिला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश
Nagpur News : नागपूर हळहळलं! अर्ध्या तासाच्या अंतराने बाप – लेकाचा मृत्यू
Sharad Mohol Murder Case : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह ‘या’ व्यक्तीला सुनावली पोलीस कोठडी
Mumbai News : घाई नडली ! मांजाने गळा चिरल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Accident News : पोहरादेवीला नवस फेडण्यासाठी निघालेल्या भक्तांच्या गाडीचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू
Gautami Patil : गौतमीने क्रिकेटचं मैदान गाजवलं ! ‘त्या’ हुक स्टेपनी घेतली चाहत्यांची विकेट
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलने ड्युटीवर हजर होण्याआधीच उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेच्या भेटीला; नवीन ‘ड्राफ्ट’ सादर करणार