जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे मुंबई आंदोलनावर ठाम असल्याने, आता सरकारकडून देखील त्यांची मनधरणी केली जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्नदेखील केले जात आहे. आज पुन्हा एकदा सरकारचे एक शिष्टमंडळ मनोज जरांगेच्या भेटीसाठी जाणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचा समावेश आहे. सोबतच, बच्चू कडू देखील उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने नवीन ‘ड्राफ्ट’ सादर केला जाणार आहे. त्यामुळे यावर जरांगे यांची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
कशाप्रकारे असणार मनोज जरांगेचा दौरा?
20 जानेवारी 2024
सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून सुरुवात
भोजन थांबा: कोळगाव, ता. गेवराई
मुक्काम: मातोरी, ता. गेवराई
21 जानेवारी 2024
भोजन थांबा: तनपुरवाडी, ता. पाथर्डी
मुक्काम: बाराबाभळी, करंजी घाट
22 जानेवारी 2024
भोजन थांबा: सुपा, ता. पारनेर
मुक्काम: रांजणगाव, पुणे
23 जानेवारी 2024
भोजन थांबा: कोरेगाव भीमा, पुणे
मुक्काम: चंदननगर, खराडी बायपास, पुणे
24 जानेवारी 2024
भोजन थांबा: देहू फाटा, पुणे
मुक्काम: लोणावळा
25 जानेवारी 2024
भोजन थांबा: पनवेल
मुक्काम: वाशी
26 जानेवारी 2024
थांबा: आंदोलनाचे ठिकाण, आझाद मैदान किंवा छत्रपती शिवाजी पार्क, मुंबई
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Rashmi Thackeray : रश्मी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्त्री शक्ती संवाद यात्रे’चं आयोजन
Ramdas Athawale : अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली; रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य
FASTag : 31 जानेवारीच्या अगोदर करून घ्या ‘हे’ काम अन्यथा तुमच्या कारचा FASTag होणार बंद
Suicide : प्रेम प्रकरणातून तरुणीने फ्लायओव्हरवरून थेट पाण्यात मारली उडी; Video व्हायरल
Munnawar Rana : लोकप्रिय शायर मुन्नावर राणा यांचं निधन
Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात