Jalna News

Jalna News : जालन्यात मराठा समाज आक्रमक, तरुणाने स्वत:ची बाईक पेटवली

549 0

जालना : जालन्यात (Jalna News) मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे निषेध म्हणून आज महाराष्ट्रात (Jalna News) बंदचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी निषेधावेळी जाळपोळीच्या घटना घडल्या. भोकरदनमध्ये एका मराठा आंदोलकाने स्वत:ची दुचाकी पेटवून देत घोषणाबाजी केली. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ भोकरदनमध्ये मराठा समाजाकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावेळी एका आंदोलकाने स्वत:ची दुचाकी पेटवली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन सुरू आहे. मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव या चौकात जमला आहे. विकास जाधव असे दुचाकी पेटवून देणाऱ्या आंदोलकाचे नाव आहे.

जालन्यात धुडगूस घालणाऱ्या 51 मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज पोलिसांनी आंदोलकांना डिटेक्ट करण्याचं काम सुरु केलं असून 51 मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलंय. तर शेकडो दुचाकी या जप्त केल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!