Manoj Jarange

Maratha Reservation : जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला

1619 0

मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीपासून मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाची सुरुवात 20 जानेवारी रोजी होणार आहे. मुंबईला पायी मोर्चा कुठून कुठेपर्यंत आणि कधी निघणार याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

कसा असेल मार्ग?
शहगड, गेवराई मार्गे खरवंडी नगर पाथर्डी, तासगाव, करंजी घाट, नगर, केडगाव, सूप, शिक्रापूर, पुणे-मुंबई महामार्ग, वाशी, चेंबूर, दादर, शिवाजी पार्क, आझाद मैदान असा मोर्चा असणार आहे. अंतरवाली, नगर, पुणे, वाशी, चेंबूर दादर असं मोर्चाचं स्वरुप असेल. या मोर्चात जसं जमेल तसं सहभागी व्हावं असं आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी मनोज जरांगे यांनी मार्गातील गावांनी मदत करावी. जर कुठे व्यवस्था झाली नाही तर मराठ्यांनी स्वत:ची व्यवस्था करावी. आपलं वाहन आहे त्यालाच घराचं स्वरुप द्या. थंडी पावसापासून बचाव झाला पाहिजे. शेकडो गावे एकत्र येऊन आपली सोय करतील अशी माझी अपेक्षा आहे. संख्या मोठी असेल त्यामुळे मदत पुरेल की नाही माहिती नाही. आवश्यक औषधे सोबत घ्या, आपआपला स्वयंकाप करा, गोळ्या खा, रेटून जेवा आणि पायी चला असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला

Madhya Pradesh Accident : बस आणि डंपरचा भीषण अपघात,12 जणांचा मृत्यू

Microsoft : मायक्रोसॉफ्टचा एक निर्णय अन् कोरोडो लॅपटॉप होणार बाद!

Pune News : पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा हैदोस; महिला पोलिसांसमोरच कोयता व तलवारीने माजवली दहशत

Satara Firing : सातारा हादरलं ! साताऱ्यात कमानी हौद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार

Accident News : साईबाबांचे दर्शन राहिलं अधुरं! साईभक्तांच्या गाडीचा भीषण अपघात

Pune Blast : पुण्यातील विमाननगर परिसरात 10 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

Shikhar Dhawan : गब्बरने आपल्या मुलासाठी लिहिली काळीज चिरणारी पोस्ट; वाचून तुम्हीदेखील व्हाल भावुक

Suicide Thinking : आत्महत्येचा विचार येताच डायल करा ‘104’ प्रेरणा प्रकल्पाच्या ‘या’ हेल्पलाइनने मिळणार नवजीवन

Satara Crime : सातारा हादरलं ! मनातल्या ‘त्या’ भीतीपायी वडिलांनी पोटच्या लेकराचा घेतला जीव

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!