Maratha Reservation

Maratha Reservation : ‘ट्रॅप रचणाऱ्यांबाबत गौप्यस्फोट करणार’ जरांगें पाटलांनी केली मोठी घोषणा

2087 0

पुणे : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा (Maratha Reservation) आजचा पाचवा दिवस आहे. जरांगे आज पुण्यातल्या खराडीमधून लोणावळ्याकडे रवाना होतील. पिंपरी-चिंचवडमार्गे मराठा आंदोलक लोणावळ्यात दाखल होतील. लोणावळ्यामध्ये त्यांचा रात्रीचा मुक्काम असणार आहे. राज्य सरकारकडून अजूनही मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटील मुंबईतल्या आंदोलनावर ठाम आहेत. या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

जरांगे पाटलांनी दिला इशारा
मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी ट्रॅप रचला जात असल्याचा खुलासा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. माझ्यावर ट्रॅप रचणाऱ्यांच्या नावांचा लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. ट्रॅप रचणाऱ्यांची नावं मुंबईत जाहीर करणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे. नेत्यांनी मराठा बांधवांचा फक्त वापर केला. तेव्हा शहाणे व्हा आणि आरक्षण मिळेपर्यंत राजकारण करु नका असं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेची वाहतूक गुरुवारी राहणार बंद

Maharashtra Board Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेच्या वेळेसंदर्भात बोर्डाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या पुणे शहरातील मोर्च्याचा कशाप्रकारे असणार मार्ग

Accident In Nagar-Kalyan Highway : नगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Pune News : FTII मधील बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!