Manoj Jarange

Manoj Jarange : ‘सरकारची भूमिका स्पष्ट नाही’; ‘या’ 9 मागण्यांसाठी मनोज जरांगें यांनी पुन्हा सुरु केले उपोषण

295 0

मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे तिसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलंय. सगेसोयऱ्यांच्या कायद्याबाबात सरकारची भूमिका स्पष्ट नाही, त्यामुळे मी आजपासून बेमुदत उपोषणाला बसत आहे, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. येत्या 15 फेब्रुवारीपासून आरक्षणाच्या कायद्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. मात्र त्याआधीच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. यावेळी त्यांनी सरकार समोर 9 मागण्या मागितल्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊया…

मनोज जरांगे पाटलांच्या ‘या’ आहेत 9 मागण्या
सगे सोयरे शब्दाच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून त्याची अमंलबजावणी करा
हा कायदा बनण्यासाठी येणाऱ्या दोन दिवसात विशेष अधिवेशन घ्या
57 लाख नोंदी सापडल्या त्यांना तातडीने प्रमाणपत्र द्या,त्यांच्या नातेवाईकांना शपथ पत्राच्या आधारे प्रमाणपत्र द्या
ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या याद्या ग्रामपंचायतवर लावा
बंद पडलेली शिबिरं पुन्हा सुरु करण्यात यावीत
अंतरवालीसह राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या
हैद्राबाद, बॉम्बे गॅझेट मधील नोंदी ग्राह्य धरा
शिंदे समितीचे काम युद्ध पातळीवर सुरु ठेवून एक वर्षाची मुदतवाढ द्या
मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा करा त्याची अंमलबजावणी करा

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार अवकाळी पाऊस; आयएमडीने दिला इशारा

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

Jalgaon Crime News : धक्कादायक ! जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या

Share This News

Related Post

लाल महालात लावणीचे शूटिंग केल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा

Posted by - May 21, 2022 0
पुणे- लालमहालात विनापरवानगी लावणी नृत्य केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संभाजी ब्रिगेड संघटनेने तक्रार केली होती.…

बाळासाहेब ही म्हणाले असतील शाब्बास संजय!; केदार दिघे यांचं ट्विट चर्चेत

Posted by - July 31, 2022 0
मुंबई: शिवसेना नेते राज्यसभा खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं असून संजय राऊत यांच्यावर…
Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवारच्या मर्डर मिस्ट्रीमध्ये आला नवा ट्विस्ट; ‘त्या’ कॉलने वाढवला सस्पेन्स

Posted by - June 20, 2023 0
पुणे : दर्शना पवार प्रकरण (Darshana Pawar Murder Case) सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. काही दिवसांपूर्वी MPSC परीक्षेत उत्तीर्ण…

धक्कादायक ! रक्त पेढीतून दिलेल्या रक्तातून 4 मुलांना HIV ची लागण, एका मुलाचा मृत्यू

Posted by - May 26, 2022 0
नागपूर – ‘ब्लड बँके’तून दिलेल्या रक्तातून नागपूर जिल्ह्यातील चार मुलांना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापैकी एका…

नाशिक-औरंगाबाद मार्गावर शिवशाही बस पेटली, थोडक्यात वाचला प्रवाशांचा जीव

Posted by - April 26, 2022 0
नाशिक- नाशिक-औरंगाबाद मार्गावर निफाड तालुक्यातील बोकडदरे येथे शिवशाही बसला आग लागून ही बस भस्मसात झाली. ही घटना आज घडली. बस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *